पंढरपूर तालुका अध्यक्षपदी संग्राम नागणे यांची निवड

उपाध्यक्षपदी जितेंद्र (नाना) पोरे, मीना वाघमारे यांच्या निवडी


पंढरपूर : ईगल आय मीडिया

दि. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी उपरी येथील ग्रामपंचायत कर्मचारी संग्राम नागणे यांची तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग गोवे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी मिना वाघमारे , जितेंद्र (नाना) पोरे यांच्या निवडी करण्यात आल्या.

पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या शेतकरी भवन येथे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव व कार्याध्यक्ष मोहन लामकाने यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपुर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, पेन्शन , सुधारित किमान वेतन, आकृतीबंध शिथील करणे उपदान, प्रा.फंड, १० % नौकर भरती इ . प्रश्न अडी-अडचणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी संग्राम नागणे यांची तालुकाध्यक्ष म्हणुन एकमताने निवड करण्यात आली.तर सचिवपदी दाजी पाटोळे, उपाध्यक्ष मिना वाघमारे , जितेंद्र (नाना) पोरे यांच्या निवडी करण्यात आल्या. कार्याध्यक्षपदी पांडुरंग गोवे, संघटक देशमुख, विशाल देशमुख, खजिनदार कल्याण गवळी यांच्या निवडी करण्यात आल्या. तर मार्गदर्शक पंडीत रणपिसे, सहसचिव तानाजी लोखंडे, मंगळवेढा निरीक्षक अनिल गायकवाड, सदस्यपदी सोमनाथ धोत्रे, दिगंबर वाघमारे, अनिल गायकवाड, जमीर शेख, नवनाथ सपाटे, सीताबाई गेजगे यांच्याही निवडी करण्यात आल्या आहेत.

सर्वांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्व नुतन पदाधिका ऱ्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव व मसुदेव रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बालाजी पवार, शहाजी देशमुख, राहुल शिंदे इत्यादीसह ग्रामपंचायत कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी आभार बंडु कारंडे यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!