करकम्ब, गादेगाव शंभरहून अधिक अर्ज दाखल
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीसाठी एकूण 3333 अर्जांपैकी 21 गावातील 33 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे आता 3133 उमेदवारांचे 3 हजार 300 अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी किती अर्ज माघारी घेतले जातात यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.
सर्वाधिक अर्ज करकम्ब, गादेगावात
अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत तालुक्यातील 72 ग्रामपंचायत साठी 3333 अर्ज दाखल झाले होते, यामध्ये सर्वाधिक 112 उमेदवारांचे 124 अर्ज करकम्ब साठी तर गादेगाव 119 अर्ज दाखल झाले आहेत. तर सर्वात कमी 10 अर्ज मगरवाडी ग्रामपंचायत साठी दाखल झाले आहेत.
तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायत पैकी कासेगाव 80 अर्ज, भाळवणी 63, वाखरी 77, पटवर्धन कुरोली 70 अर्ज दाखल झाले आहेत.
नामंजूर झालेल्या अर्जामध्ये सोनके 2 , आणवली 1, कासेगाव 2, खर्डी 1, तपकिरी शेतफळ 1, आजनसोड 1, सुस्ते 3, उंबरे 3, करोळे 2, पेहे 1, सांगवी 1, भाळवणी 2, उपरी 1, सुपली 1, पळशी 1, भोसे 1, पटवर्धन कुरोली 3, आंबे 2, सरकोली 1, ओझवाडी 1, वाखरी 2, आदी 21 गावामधील 33 जणांचे उमेदवारी अर्ज आवश्यक कागदपत्रे, वय , आदी कारणास्तव नामंजूर करण्यात आले आहेत.
आज ( दि.31 रोजी ) अर्ज छाननी वेळी वाखरी , तिसंगी, अनवली, कासेगाव, खर्डी,अजनसोड, तपकिरी शेटफळ, सुस्ते, उंबरे, करोळे, पेहे, सांगवी, भाळवणी, उपरी, सुपली,पळशी, भोसे, पटवर्धन कुरोली, आंबे आणि सरकोली या 21 गावातील 33 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याकडे लक्ष लागले आहे.