आजवर दाखल एकूण अर्ज 420
पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील 72 ग्रामपंचायती साठी निवडणूक होत असून आज ( दि.28 रोजी ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तिसऱ्या दिवशी 308 उमेदवारांचे 332 अर्ज दाखल झाले आहेत. तर पहिल्या दोन दिवसांत 88 अर्ज दाखल झाले होते.
पंढरपूर तालुक्यातील 94 पैकी तब्बल 72 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. याकरिता गावोगावी मोर्चे बांधणी सुरू आहे. उमेदवार निवडी, आघाडी बनवणे, प्रचाराची मोहीम आखणे आदी कामे सुरू आहेत.
28 डिसेंम्बर रोजी दाखल अर्ज पुढीलप्रमाणे ( कंसात एकूण अर्ज संख्या) वाखरी 6 ( 11 ) गादेगाव 8 (9 ) , चिलाई वाडी 4 ( 6 ), रांझनी 2 ( 3 ) , उंबरे 33 ( 40 ) पिराची कुरोली 9 ( 12 ) , आंबे चिंचोली 8 (11) , फुलचिंचोली 1 (2 ), नारायण चिंचोली 19 ( 21 ), भाळवणी 24 ( 25) , शंकरगाव नळी 2, भंडीशेगाव 24 ( 25 ), शिरढोन 9 ( 18 ) , सरकोली 15 ( 16 ), जैनवाडी 18, पळशी 14 (35), सिद्धेवाडी 1, मुंढेवाडी 2, ओझेवाडी 3, भोसे 5, गोपाळपूर 2, पटवर्धन कुरोली 9 (12 ) , कौठाळी 5, चिंचोली भोसे 6, खेडभाळवणी 10, चळे 2, आंबे 3, भंडीशेगाव 11, सुपली 16, बोहाळी 3, उंबरगाव 12, वाडी कुरोली 7, तिसंगी 7, करकम्ब 1, अजनसोंड 1, सुस्ते 1, शेगाव दु.3, देगाव 2, अव्हे – तरटगाव 3, नांदोरे 1, बाभूळगाव 3, आढिव 3, उपरी 3, उजनी वसाहत 2, पेहे 14, तावशी 11, सोनके 15, भटुंबरे 8 असे एकूण 45 ग्रामपंचायत साठी 332 तर एकूण 420 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 23 ते 30 डिसेंबर असल्याने 23 पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र 25 ते 27 डिसेंबर अशी सलग 3 दिवस शासकीय सुट्टी असल्याने अर्ज दाखल करता आले नव्हते.
आज सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. निवडणूक विभागाने ग्रामपंचायत ची संख्या लक्षात घेता 4 ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची सोय केली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी केवळ 2 अर्ज दाखल झाले होते. मात्र आज ( गुरुवारी ) दुसऱ्या दिवशी तब्बल 86 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे एकूण 88 अर्ज दाखल झाले आहेत.