राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

15 जानेवारीला मतदान :18 ला निकाल

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम असा आहे.

टीम : ईगल आय मीडिया

राज्यातील 14 हजार 234निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 18 जानेवारी रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसांपासून म्हणजेच 23 डिसेंम्बर पासून आचारसंहिता लागू होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील मार्च 2020 ते डिसेंम्बर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या सर्व म्हणजे 14 हजार 234 ग्रामपंचायतींचा निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर २०२०
उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत : २३ ते ३० डिसेंबर २०२० (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
उमेदवारी अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२०
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ जानेवारी २०२१
मतदान : १५ जानेवारी २०२१ (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 )
मतमोजणी : १८ जानेवारी २०२१

त्यानुसार15 डिसेंम्बर रोजी तहसीलदार निवडणूक नोटीस जाहीर करतील, 23 डिसेंम्बर रोजी उमेदवारी अर्ज खरेदी आणि दाखल करण्यास सुरुवात होईल. त्या दिवसापासून निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. 31 डिसेंम्बर रोजी अर्ज छाननी होईल, 4 जानेवारी 2021 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी 4 जाने.रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले जाईल.

15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक मतमोजणी आणि निकाल 18 जानेवारी रोजी जाहीर होईल. अचानकच निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच गावगाड्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!