पंढरपूर : ईगल आय मीडिया
ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीमध्ये 12 महिला, 13 पुरुष obc आरक्षण होते. करकम्ब सह पिराची कुरोली, तावशी , सुपली, उपरी, अशी गावे obc प्रवर्गासाठी राखीव झाली आहेत. याशिवाय नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जैनवाडी, आजोती, पांढरेवाडी, लोणारवाडी, शिरगव, पोहोरगाव, खरातवाडी, जाधववाडी, तनाळी, केसकरवाडी, खेडभोसे, शंकरगाव नळी, टाकळी गुरसाळे, नेमतवाडी, उजनी, पिराची कुरोली, होळे, नांदोरे, पुळूजवाडी, बोहळी, कोरटी, गोपाळपूर, गारडी, ईश्वर वठार, शेंडगेवाडी, सुपली ही 25 गावे राखीव झाली आहेत
येथील शासकीय गोदामात आज तालुक्यातील 94 गावच्या सरपंच आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली आहे. लोकसंख्या निकष ठरवून तालुक्यातील गावे आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये 3 गावे अनुसूचित जमाती साठी राखीव झाली आहेत. तारापूर, रोपळे आणि शेगाव दुमाला या तीन गावचे सरपंच पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे.
तट अजनसोंड, भंडीशेगाव, गादेगाव, नारायण – चिंचोली गारडी, तिसंगी, सोनके, आंबे चिंचोली, कोंढारकी, सुस्ते, शेवते,शिरढोन, मेंढापुर, नेपटगाव, चाळे, भटुंबरे, पळशी, खरसोळी, उंबरगाव, आव्हे-तरटगाव ही 20 ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जाती साठी राखीव झाले आहे.