5 व्या फेरीतील निकाल धक्कादायक

अनेक गावांत परिवर्तन : साखर कारखान्याच्या संचालकांना धक्के

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 5 व्या फेरीत धक्कादायक निकाल लागले आहेत. अनेक गावात परिवर्तन झाले आहे.साखर करखाण्याच्या अनेक संचालकांना धक्के बसले आहेत आणि अनेक महत्त्वाच्या गावात सत्ता परिवर्तन झाले आहे.

बोहाळी ग्रामपंचायत मध्ये 6 जागा भालके -काळे आणि परिचारक 5 जागा मिळाल्या आहेत. शेगाव दुमाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 7 जागा भालके गटाला तर परिचारक गटाला 4 जागा मिळाल्या आहेत. चिंचोली भोसेमध्ये परिचारक – शिंदे आघाडीने सत्ता काबीज केली असून 4 जागा जिंकल्या तर भालके गटाला 3 जागा मिळाल्या आहेत.

अनवली ग्रामपंचायतमध्ये स्वाभिमानी विकास आघाडी 9 जागा तर देशमुख – शिंदे आघाडी 2 जागी विजयी झाले आहेत. आव्हे ग्रामपंचायत मध्ये परिचारक – काळे आघाडी 8 तर भालके गट 1 जागी विजयी झाले आहेत. उजनी वसाहत ग्रामपंचायतमध्ये सर्व 7 जागा परिचारक गटाने जिंकल्या आहेत.

तर सिद्धेवाडी ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन झाले असून परिचारक -अवताडे -काळे गटाने 11 जागा जिंकल्या आहेत. येथे भालके गटाला एकही जागा मिळाली नाही. शिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिचारक गटाने 5 जागा सर्वपक्षीय गटाने जिंकल्या तर 2 उमेदवार परिचारक गटाचे विजयी झाले आहेत. उंबरे ग्रामपंचायतमध्ये परिचारक गट 8 जागा तर 3 जागा स्थानिक कोरके गटाने जिंकल्या आहेत.

मुंढेवाडीत नोटाला सर्वाधिक मते


ओझेवाडीमध्ये 7 जागा परिचारक गटाने तर, 4 जागा भालके -परिचारक गटाने जिंकल्या आहेत. मुंढेवाडीत नोटाने रंगत आणली प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वाधिक 420 मते नोटा ला मिळाली आहेत. तर 7 जागा नारायण मोरे – परिचारक गटाने तर 4 जागा भालके – परिचारक गटाने मिळवल्या आहेत. मतमोजणी संथगतीने सुरू असून सर्व निकाल हाती येण्यास 3 वाजण्याची शक्यता आहे.

आढीव ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन झाले असून येथे परिचारक-भालके- काळे आघाडीने 10 जागा जिंकल्या तर अपक्षाला केवळ 1 जागा मिळाली असून तो उमेदवार सुद्धा केवळ 1 मताने जिंकला आहे.
शेळवे गावात परिचारक गटाने 8 काळे- भालके 3 जागा जिंकल्या आहेत.


आंबे ग्रामपंचायतमध्ये धक्कादायक निकाल आला असून भालके गटाच्या युवा आघाडीने 7 तर काळे – परिचारक गट 4 जागी विजयी झाला आहे.खेडभाळवणीमध्ये भालके – परिचारक गटाच्या 5 आणि भालके काळे गटाने 4 जागा जिंकल्या आहेत. शेवते ग्रामपंचायत मध्ये विठ्ठलचे संचालक दशरथ खळगे यांच्या गटाने 8 जागा तर 3 परिचारक गटाने जिंकल्या आहेत.

बाभूळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक गटाने 8 तर विरोधी भालके -काळे गटाने 2 जागा जिंकल्या आणि 1 जागा अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!