हाथरस च्या आरोपींना कठोर शिक्षा करा

पंढरपूर रिपाईच्यावतीने मागणी : तहसीलदार यांना निवेदन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणी घटनेचा निषेध करीत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदार वैशाली वाघमारे यांना देण्यात आले.

या वेळी आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, रिपाई शहर अध्यक्ष संतोष पवार, कुमार भोसले, दयानंद बाबर, कैलास कांबळे, संतोष सर्वगोड, समाधान लोंखडे, सचिन भोसले,अमित कसबे, सचिन गाडे, राहुल मोरे, सचिन भोरकडे, अजिंक्य ओव्हाळ,बाळासाहेब सर्वगोड उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!