हाथरस घटनेच्या निषेधार्थ आंदोलन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आज महात्मा गाधी जयंतीच्या दिवशी संतपेठ गुजराती कॉलनी येथे सर्व कर्मचारी यांनि एक दिवस कामबंद करून आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी मोठया संख्येने कामगार बंधू भगिनी उपस्थित होते.
यावेळी आर.पी.आय नेते सुनिल सर्वगोड ,अध्यक्ष गुरु दोडिया, बहुजन रयत परिषदेचे किशोर खिलारे, भिमशक्ती मंडळाचे किशोर दंदाडे, मेहतर समाजाचे काशीनाथ सोलंकी, माधव सोलंकी, महेश गोयल, प्रमोद वाघेला, सचिन सोलंकी, नगरसेवक राजू सर्वगोड, कृष्णा वाघमारे, सामाजिक कार्यक्रते संतोष सर्वगोड, काँग्रेसचे शहराध्यक्षअँड राजेश भादुले मोठया संख्येने मेहतर रूखी, व कामगार बंधू – भगिनी उपस्थित होते.