विवेक वर्धिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी राजेंद्र पाराध्ये

पंढरपूर : प्रतिनिधी

श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय च्या मुख्याध्यापकपदी राजेंद्र पाराध्ये यांची प्रशासकीय बदली करण्यात आली. श्री भुताडे बी एल यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती मुळे रिक्त झालेल्या पदावर पाराध्ये यांची श्री दत्त विद्यामंदिर सुस्ते येथून बदलीने संस्थेने नियुक्ती केली आहे.

आरडी पाराध्ये हे गेली 34 वर्षा पासून प्रशालेत सेवा करीत असून इंग्रजी विषयाचे तज्ञमार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्याशिवाय त्यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्यामध्ये नावलौकिक आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.


संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पाराध्ये यांच्या निवडीबद्दल उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ, सचिव ॲड. वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, ज्येष्ठ संचालक मुकुंद देवधर, आप्पासाहेब चोपडे, दिलीपआप्पा घाडगे, विजयकुमार माळवदकर, अनिरुद्ध सालविठ्ठल यांनी त्यांचे अभिनंदन केले.


या कार्यक्रमाच्या वेळी पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्यूनिअर विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे, राजुभाई मुलाणी,वरिष्ठ लेखनिक हनुमंत मोरे, अधीक्षक अमोल हुंगे ,सुनीता नडगिरे, राजकुमार ढगे,नागनाथ मैंदर्गी, आनंद पोटे, बोधले,सुधाकर देशमाने, विलास पवार, अनिल सोनार,तानाजी चोपडे, विजय कर्णेकर,अनिल जाधव व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!