आय सी यू मध्ये भरती : आज शस्त्रक्रिया होणार
टीम : ईगल आय मीडिया
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या गांगुली ची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याचे सांगितले जाते.
शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करून झाल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
पी टी आय ने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान क्रिकेट प्रेमींच्या लाडक्या सौरव दादा ला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समजताच क्रीडा रसिकातून दादाच्या प्रकृती त लवकर सुधारणा व्हावी अशा सद्भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.