भीषण अपघात 4 जण ठार

कार आयशर टेम्पोला धडकली

टीम : ईगल आय मीडिया

शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिधोरा येथील रिलायन्सच्या पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि ट्रकला भीषण अपघात झाला आहे. त्यात चौघांचा मृत्यू झाला आहे.

धनजंय नवघरे, (२१) विशाल नवघरे, (२२)मंगेश नामदेव राऊत( २८) व चालक शुभम कुटे (२३ वर्षे ) सर्व जण पांगरिकुटे, ता.मालेगाव, जिल्हा वाशिम येथील रहिवासी आहेत. अशी मृतांची नावे आहेत. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे गुरुवारी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. अपघातग्रस्त कार (एमएच ३७ बी ८२६२ ) शेगावहून ही कार वाशिमच्या दिशेनं जात होती. या कारला समोरून येणाऱ्या एका ट्रकनं दोरदार धडक दिली. शुभम कुटे हा वाहन चालवित होता. रिधोरा येथील पेट्रोल पंपाजवळ त्यांनी एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात त्यांची कार ( एम एच १९ सी वाय ६४०४) समोरून आलेल्या आयशर ट्रकवर धडकली.

या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हे चौघेही वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरी (कुटे) येथील आहेत.

या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!