अंत्यविधी उरकून परतणाऱ्या जमावात ट्रक घुसला : २ महिला ठार , ६ जखमी

टाकळी पुनर्वसन येथील दुर्घटना

पंढरपूर : eagle eye news

सासऱ्याचा अंत्यविधी ऊरकून घरी घराकडे परत निघालेल्या शोकाकुल महिलांच्या जमावात भरधाव वेगाने आलेला ट्रक घुसला. यामधे दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर सहा महिला जखमी झाल्या आहेत.

टाकळी ( गुर्साळे,तालुका पंढरपूर ) येथील गेनदेव गुटाळ यांचे शुक्रवारी ७ वाजता निधन झाले होते. यांच्यावर रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास गुरसाळे गावच्या स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल महिला पंढरपूर – वेनेगाव रोडच्या बाजूने घराकडे परतत असताना करकंब कडून भरधाव वेगाने येणारा मालट्रक महिलांच्या घोळक्यामध्ये घुसला.

या भीषण अपघातात मयत गुटाळ यांच्या दोन सुना हिराबाई भारत गुटाळ वय 35 वर्षे व मुक्ताबाई गोरख गुटाळ वय 40 वर्षे या ठार झाल्या. तर इतर सहा महिला गंभीर जखमी झाल्या. गुरसाळे येथे टाकळी जवळ पंढरपुर-वेणेगाव रस्यावर शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला.

Leave a Reply

error: Content is protected !!