राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या मृत्यूची संख्या 144

अजूनही 100 जण बेपत्ता

टीम : ईगल आय मीडिया

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या दुर्घटनात आतापर्यंत एकूण 144 लोकांचा बळी गेला आहे, तर 100 लोक अजूनही बेपत्ता आहेत.शिवाय 2 हजार 500 हुन अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

दरम्यान, पूरग्रस्तांना भेटण्यासाठी तसेच परिस्थिती ची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यावर निघाल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. तसेच तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा बळावली आहे.


मागील आठवड्यात महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि पुणे, सातारा,कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आणि भूस्खलनात आजवर 144 लोकांचा बळी गेला आहे. बाधित नागरिकांच्या बचावासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मदत व पुनर्वसन विभागाने आज ( सोमवारी ) माहिती दिली की, 1002 बाधित गावांमध्ये विविध घटनांमध्ये झालेल्या मृतांचा आकडा 144 वर पोहोचला आहे.


“पूरग्रस्त भागातून सुमारे 2.2 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 2 हजार 564 जनावरे मरण पावली आहेत. एकूण 56 लोक जखमी झाले आहेत आणि 1002 गावे बाधित आहेत. 100 लोक अद्याप बेपत्ता आहेत,” अशीही माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!