अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. परंतु शासनाने अद्याप पंचनामे करण्याचे आदेश दिले नाहीत. नुकसानभरपाई त्वरित मिळावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने नेेेते माऊली हळणवर यांनी केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचंड व मुसळधार पाऊस पडत असून यामुळे अनेक ओढे नाले ना पूर आलेला आहे अनेकांचे शेती साहित्य पिके वाहून गेली आहेत. इकडे लाँकडाऊनमुळे शेतीमालाला बाजार भाव नाही. त्यातच हा प्रचंड पाऊस पडलेला आहे.

तालुक्यांमध्ये कासेगाव, ओझेवाडी, खर्डी, तावशी,उपरी, पळशी, भाळवणी, पटवर्धन कुरोली भागामध्ये ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांची केळी, द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला, फुलशेती याचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा बळीराजा संघटनेच्यावतीने तीव्र स्वरूपाचा आंदोलन केले जाईल. असा ईशारा माऊली हळनवर दिला आहे. यावेळी बळीराजाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, गोपाळ पाटील, तानाजी सोनवणे, औदुंबर सुतार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

error: Content is protected !!