पंढरपूर शहरात पावसाने दाणादाण : सखल भागातील घरात पाणी

पंढरपूर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले


प्रतिनिधी : पंढरपूर
परतीच्या पावसाने पंढरपूर तालुक्यास सलग दुसऱ्या दिवशी झोडपून काढले आहे. मंगळवारी रात्री ते मध्य रात्री पर्यंत तालुक्यातील 9 पैकी 8 मंडलात  एकूण 228 मिमी पाऊस झाला तर बुधवारी सकाळपासून पावसाने जोरदार ते मध्यम स्वरूपात सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळेच पंढरपूर तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.


बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून तालुक्यातील सर्वच भागात  मध्यम ते जोरदार स्वरुपात पावसाच्या सरी कोसळत होत्या. सकाळी 11 वाजेपर्यंत सर्व दूर भागास पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पंढरपूर शहरातील सखल भागातील अनेक घरात पावसाचे पाणी गेले. तर बहुतांश रस्त्यावर पावसाचे पाणी वाहत होते. 

पंढरपुर तालुक्यातील दि. 12 ऑक्टोबर रोजीचे पर्जन्यमान मंडलनिहाय खालीलनुसार आहे.
करकंब- 13 मिमी
पट कुरोली 43 मिमी
भंडीशेगाव 29 मिमी
भाळवणी- 33 मिमी
कासेगाव – 45 मिमी
पंढरपूर- 35 मिमी
तुंगत- 00 मिमी
चळे- 19 मिमी
पुळुज 11 मिमी. आजचा एकूण पाऊस 228 मि.मी तर सरासरी पाऊस 25.33 मि.मी.


ग्रामीण भागातील ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक भागात शेताचे बांध पावसाने वाहून गेले आहेत.  राष्ट्रीय महामार्गावर वाडी कुरोली येथील नाल्यात पाणी तुंबले. याठिकानी पुलाचे काम सदोष झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असून पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने अनेकांच्या घरात पाणी गेले. 

Leave a Reply

error: Content is protected !!