गुरुवारी मध्यरात्री बरसला 227 मिमी पाऊस
पंढरपूर : ईगल आय मीडिया
बुधवारी रात्री ते गुरुवारी मध्यरात्री च्या दरम्यान पंढरपूर तालुक्यातील सर्वच भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. पंढरपूर शहरात सर्वाधिक 75 मिलिमीटर एवढा मुसळधार पाऊस झाला आहे तर तालुक्यातील सर्व आठही सर्कल्समध्ये पावसाने एकाचवेळी हजेरी लावल्याने संपूर्ण तालुका चिंब झाला आहे.
यंदाचे वर्ष पंढरपूर तालुक्यासाठी पर्जन्यमानाच्या अनुषंगाने अतिशय सुखावह ठरले आहे. 1 जूनपासून तालुक्याच्या सर्वच भागात दर एक दोन दिवसांनी पाऊस हजेरी लावतो आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व भागात यंदा खरिपाची पिके जोमदार आहेत. सर्व भागातील भूजल पातळी उंचावली असून यंदा 30 जुलै अखेर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.
बुधवारी रात्री उशिरा ते गुरुवारी पहाटे 3 वाजेपर्यंत तालुक्याच्या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे. विशेषतः पंढरपूर शहरात 75 मिलिमीटर एवढा धुवाधार बरसला आहे. तर भंडीशेगाव सर्कल 30 मिमी, पटवर्धन कुरोली सर्कल 31 मिमी. तुंगत सर्कल 32 मिमी. एवढा पाऊस पडला आहे. करकम्ब सर्कलमध्ये सर्वात कमी 15 मिमी एवढा पाऊस झाला असून तालुक्यातील शेतकरी यंदा कमालीचा सुखावला आहे..
यंदा उजनीच्या पाणीसाठ्याची वाटचाल ही 10 टक्के इतकी झाली असून ही वाढ उजनीच्या धारणक्षेत्रात झालेल्या पावसावर आहे. पुणे जिल्ह्यात यंदा तुलनेने पाऊस कमी झाला असून उजनीत उणे 15 टक्के पासून अधिक 10 टक्के म्हणजे एकूण 25 टक्के इतका पाणी साठा धरण क्षेत्रातील पावसामुळे झालेला आहे.
आज दि. 30 जुलै रोजी पर्जन्यमान मंडलनिहाय खालीलप्रमाणे आहे.
करकंब 15 मिमी
पट कुरोली 31 मिमी
भंडीशेगाव 30 मिमी
भाळवणी 25 मिमी
कासेगाव 28 मिमी
पंढरपूर 75 मिमी
तुंगत 32 मिमी
चळे 24 मिमी
पुळुज 17 मिमी
8 सर्कलमध्ये रात्रीत एकूण पाऊस 277 मिमी एवढा दमदार पाऊस झाला आहे.
30 जुलै रोजी तालुक्यातील सर्व मंडलामध्ये सरासरी पाऊस 30.77 मि. मी. इतका पाऊस झाला आहे. तर 30 जुलै अखेर सरासरी पाऊस 323.22 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.
एकूनच समाधानकारक पाऊस झाल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यंदा शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण पसरले आहे.