कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती

50 गावांचा संपर्क तुटला : एन डी आर एफ चे पथक रवाना

रामानंदर नगरात पुराचे पाणी आले आहे.
चिपळूण महापूर व्हीडिओ पहा

टीम : ईगल आय मीडिया

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळीकडे जात असून जिल्ह्यातील ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर शहरातील सखल भागात अनेक घरात पाणी घुसल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापुरकडे रवाना झाल्या आहेत.

ही बातमी वाचली का ?

मागील 3 दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यास बुधवारी रात्रभर पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. 77 बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे अनेक रस्तेही बंद झाले आहेत. कोल्हापूर ते गगनबावडा, मलकापूर ते रत्नागिरी हे प्रमुख राज्य महामार्ग रात्री पासून बंद झाले आहेत. या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे.

कोल्हापूर शहरात रामानंदनगर येथे जयंती नाल्याचे पाणी अनेक घरात घुसले आहे. जरगनगर कडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. जिल्ह्यातील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील जवळजवळ ५० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. आज दिवसभरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून सध्या या पाण्याची पातळी ३७ फुटांपर्यंत पोहोचली आहे. ३९ फुटांवर पाणी पोहोचल्यास धोक्याचा इशारा समजला जातो. त्रेचाळीस फुटावर पाणी गेल्यास महापुराचा धोका निर्माण होतो. बहुतेक सर्व धरणे भरत आली असून धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीतील पाणी इशारा पातळीकडे निघाल्याने जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!