पिलीव येथील बाळासाहेब खरे मयताचे नाव
टीम : ईगल आय मीडिया
बुधवारी सायंकाळी झालेल्या अतिवृष्टी मुळे माळशिरस तालुक्यातील शिंगोरणी येथील ओढ्याच्या पाण्यात कार सह एकजण वाहून गेला. आज सकाळी त्यांचा मृतदेह मिळाला आहे.
.बाळासाहेब विष्णू खरे असे वाहून गेलेल्या मयताचे नाव आहे.
पिलीव ( ता.माळशिरस) येथील बाळासाहेब खरे (वय 45 वर्षे ) यांचे आटपाडी येथे मेडिकल दुकान आहे. आटपाडीहून शिंगोर्णी मार्गे पिलीवकडे बुधवारी सायंकाळी कारमधून येत होते. अतिवृष्टीमुळे शिंगोर्णीच्या ओढ्याला पूर आला होता.
पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी चार (mh45, n 6081) चाकी गाडी ओढ्यावरील पूलावर घातली. मात्र पाण्याला वेग आसल्याने गाडी वाहून गेली व जवळच्या झाडाला धडकली. यावेळी कारचा दरवाजा उघडला आणी आणि खरे वाहून गेले. 300 मीटरच्या आसपास वाहत जावून त्यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी मृतदेह सापडला असून पोलीस पंचनामा करून पीएम केले जाणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी आई, दोन मुले, दोन बंधू आहेत. बालासाहेब खरे हे दररोज पिलीव ते आटपाडी कारमधून जाऊन दुकान चालवित होते. त्यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.