भीषण अपघात : 18 ठार 15 जखमी

प्रवासी बसला ट्रकने दिली धडक

टीम ; ईगल आय मीडिया

अयोध्या जिल्ह्यातील रामस्नेहीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अयोध्या – बाराबंकी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 16 प्रवासी ठार तर 15 जखमी झाले आहेत. आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पंजाबच्या लुधियानाहून प्रवासी घेऊन बिहारकडे जाणाऱ्या डबल डेकर खासगी बसला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 15 प्रवासी जखमी आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरु आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, प्रवाश्यांना भरल्यानंतर लुधियानाहून बिहारकडे जाणारी खासगी डबल डेकर बस अयोध्या जिल्ह्यातील रामस्नेहीघाट पोलीस ठाण्याच्या भागात अपघाताचा बळी ठरल्याचे सांगण्यात आले आहे. आज मध्य रात्री उशिरा अयोध्या महामार्गावर मागून आलेला वेगवान ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर 15 प्रवासी लोक जखमी आहेत.

एसपी यादव यांनी सांगितले की, बाराबंकी येथील अयोध्या सीमेवरील कल्याणी नदी पुलावर डबल डेकर बसाचा एक्सल तुटल्याने बस थांबवण्यात आली होती. चालक आणि क्लिनर बस दुरुस्त करीत होते. बसमधील काही प्रवासी बसमध्ये आणि काही बाहेर चालले होते. यादरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका वेगवान ट्रकने जोरदार धडक दिली. पोलिस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

अपघाताच्या वेळी मुसळधार पावसामुळे बचाव कामातही अडचण निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना रुग्णालयात नेले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी बरीच मेहनत घेत बसच्या प्रवाश्यांना बाहेर काढले. हे काम रात्रभर सुरूच होते आणि आताही मदतकार्य सुरू आहे. या घटनेनंतर हा महामार्ग येथे जाम झाला होता, तर आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मृतांपैकी सर्व लोक बिहारचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे, सुरेश यादव, इंदल महतो, सिकंदर मुखिया, मोनू साहनी, जगदीश साहनी, जय बहादुर साहनी, बैजनाथ राम, बलराम यांची ओळख पटली असून अन्य मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. एसपी यमुना प्रसाद यांनी सांगितले की, या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे 15 लोक जखमी आहेत. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात नेले असून मृतांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविले जात आहेत.

One thought on “भीषण अपघात : 18 ठार 15 जखमी

Leave a Reply

error: Content is protected !!