देशात 3 हजारांवर मृत्यूची नोंद
टीम : ईगल आय मीडिया
देशात गेल्या २४ तासांत कोरोना संक्रमणाचे विक्रम नोंदवला असून गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (५ मे २०२१) एकूण ४ लाख १२ हजार २६२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत ३९८० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान 24 तासात तब्बल ३ लाख २९ हजार ११३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी १० लाख ७७ हजार ४१०
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४
उपचार सुरू : ३५ लाख ६६ हजार ३९८
एकूण मृत्यू : २ लाख ३० हजार १६८
करोना लसीचे डोस दिले गेले : १६ कोटी २५ लाख १३ हजार ३३९
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी १० लाख ७७ हजार ४१० वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ३० हजार १६८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.