31 हजार 855 कोरोना रुग्ण

टीम : ईगल आय मीडिया


राज्यातील आज 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या थांबताना दिसत नाही. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णंसंख्या वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. पण तरीही वाढती रुग्णसंख्या रोखता येणं कठीण होत चालल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईतील आजचा कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत आज दिवसभरात 5 हजार 185 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 88 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. दिवसभरातील मृतांची संख्या 6 आहे. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 25 लाख 64 हजार 881वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 22 लाख 62 हजार 593 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 53 हजार 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

Leave a Reply

error: Content is protected !!