राज्यात 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या उंबरठ्यावर

तर 277 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : ईगल आय मीडिया

राज्यात गेल्या 24 तासांत नव्या करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढुन तो ५० हजाराच्या उंबरठ्यावर उभा आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४९ हजार ४४७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ४७, हजार ८२७ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ १ हजार ६२० ने अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे.

या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३७ हजार ८२१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या २४ हजार १२६ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ०१ हजार १७२ वर जाऊन पोहचली आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख ०१ हजार १७२ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७३ हजार ५९९ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ६० हजार ८४६ इतका आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५२ हजार ४०८ , ठाणे जिल्ह्यात सध्या ४८ हजार ६६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३१ हजार ५१२ इतकी आहे.

आज राज्यात एकूण २७७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २०२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ३७ हजार ८२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २४ लाख ९५ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्क्यांवर आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!