हिंदू धर्म खतरेमे : ही भीती काल्पनिक

अमित शहांच्या गृह मंत्रालयाचा खुलासा

टीम : ईगल आय मीडिया

भारतात हिंदू धर्म धोक्यात असल्याची भीती काल्पनिक असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. माहिती अधिकारांतर्गत धर्माला कुणापासून धोका आहे,याची माहिती मागितली असता, अशा प्रकारचा धोका असल्याचे गृहमंत्रालयाने फेटाळले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हिंदू धर्माला असलेल्या कोणत्याही कथित धोक्यांशी संबंधित सर्व दावे फेटाळून लावले आहेत, अशा आशंका केवळ ‘काल्पनिक’ असल्याचे नमूद केले आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयाने (एमएचए) स्पष्टपणे म्हटले आहे की, हिंदू धर्माला तथाकथित ‘धमक्या’ देण्याबाबत त्याच्याकडे कोणतेही रेकॉर्ड किंवा पुरावे नाहीत, असे नागपुरातील कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांना दिलेल्या आरटीआयच्या उत्तरात म्हटले आहे.


३१ ऑगस्ट रोजी एका आरटीआय चौकशीमध्ये जबलपुरे यांनी “देशातील ‘हिंदू धर्माला धोका असल्याचे पुरावे मागितले होते, त्यानंतर साधारण एका महिन्याने गृहमंत्रालयाचे अधिकारी व्ही. एस. राणा यांनी दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे की, त्यांना हिंदू धर्माला असलेल्या धोक्याबद्दल काही कल्पना नाही. तसे पुरावेही कुठे आढळले नाहीत. जी माहिती त्यांच्या अखत्यारित आहे, जी देण्याचा त्यांना अधिकार आहे, त्या माहितीमध्ये तरी अशी कोणती शक्यता व्यक्त होत नाही. यासंदर्भात केंद्राकडे कोणतीही नोंद नसल्याने, राणा यांनी असा दावा केला की जबलपुरे यांच्या प्रश्नाला उत्तर देणे शक्य नाही.

“पहिल्यांदाच गृहमंत्रालयाच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने म्हटले आहे की ‘हिंदू धर्माला धमक्या’ यासंबंधी कोणतीही चौकशी काल्पनिक आहे आणि रेकॉर्डवर कबूल केले आहे की त्यांच्याकडे अशा कोणत्याही शक्यतांचे समर्थन करण्यासाठी कोणतेही रेकॉर्ड नाहीत”, असे जबलपुरे म्हणाले. भाजप आणि त्याचे सहयोगी, राजकीय फायद्यांसाठी, हिंदूंमध्ये एक भीती निर्माण करत आहेत की त्यांचा धर्म आणि धार्मिक ओळख गंभीर धोक्यात आहे, असे जबलपुरे म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!