देगाव येथे गॅस सिलेंडरचा स्फोट : घर जळून खाक

चार शेळ्याचा मृत्यु : मनुष्यहानी नाही

पंढरपूर : ईगल आय न्यूज

गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन राहते पत्र्याचे घर जळून खाक झाले, तर समोर बांधलेल्या चार शेळ्या मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास देगाव येथे घडली.सुदैवाने या दुर्घटनेपासून संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे.

बबन कन्हय्यालाल भुई यांचे देगाव येथील भुई वस्तीवर राहते घर आहे. शुक्रवारी रात्री शेजारीच एकजणाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याने सर्वजण तिकडे गेले होते. यादरम्यान अचानक बबन भुई यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. कांही वेळातच आगीची तीव्रता इतकी होती की पत्राशेडचे संपूर्ण घर जळून खाक झाले.

आगीची घटना समजताच ग्रामस्थांनी मदतीसाठी मोठी गर्दी केली होती. मात्र, आगीच्या ज्वाळा प्रचंड वाढल्याने घरातील धान्य, संसारोपयोगी साहित्य असे काहीही बाहेर काढता आले नाही. सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच घरासमोर अंगणात बांधलेल्या चार शेळ्याही मृत्युमुखी पडल्या. सुदैवाने घरातील सर्वजण वाढदिवसा निमित्त शेजारच्या घरात असल्याने बचावले.

Leave a Reply

error: Content is protected !!