शाह हॉस्पिटलमध्ये आणि बच्चन यांना घरी सोडले
टीम : ईगल आय मीडिया
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून 23 दिवसानंतर अमिताभ यांना घरी सोडण्यात आले आहे. अमिताभ पुत्र अभिषेक बच्चन यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
आज दिवसात भारतातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 17 लाख झालेली असून त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ही भर पडली आहे. खुद्द अमित शाह यांनीच ट्विट करून माहिती दिली आहे. या ट्विट मध्ये शाह म्हणतात की,
करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती देत शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.
अमित शाह यांनी ट्विटमध्ये पुढं म्हटलं आहे की, माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी”.
बिग बी अमिताभ बच्चन यांना 23 दिवसांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आज बिग बींचा कोरोना रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेक बच्चनने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. ११ जुलै रोजी त्यांचा, अभिषेक बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच दिवशी रात्री त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
‘सुदैवाने माझ्या वडिलांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आता घरीच आराम करतील. तुम्हा सर्वांनी केलेल्या प्रार्थनांबद्दल तुमचे मनापासून आभार’, असं ट्विट अभिषेकने केलं.