खा.शरद पवार आणि अमित शाह यांच्या गुप्त बैठक ?

गुजराती दैनिकाने दिलेल्या बातमीनंतर खळबळ

टीम : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार  आणि गृहमंत्री अमित शाह यांची अहमदाबाद मध्ये भेट झाल्याची चर्चा आहे. अतिशय गुप्त झालेल्या या भेटीवेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल उपस्थित होते असाही दावा केला जात आहे. 26 मार्च रोजी अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर ही भेट झाल्याची माहिती गुजराती दैनिक दिव्य मराठी ने दिली आहे.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून हे भाजपचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. अहमदाबादमधील फार्महाऊसवर 26 मार्चच्या रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याची माहिती होती.

दै. दिव्य मराठीतील वृत्तानुसार, राजस्थान मधील जयपूर मध्ये असलेले खा. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादला आले. ते अन्य कोणालाही भेटले नाहीत. मात्र, त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, हे भाजपचे षडयंत्र असून, शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!