हॉस्पिटलमध्ये आग : 70 रुग्ण बचावले

टीम : ईगल आय मीडिया

गुजरातच्या भावनगर जनरेशन रुग्णालयात आगीची घटना घडली असून, रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली मात्र या सर्व रुग्णांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचलेत. ही घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये ७० हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू होते.

रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. आग लागताच सर्वप्रथम रुग्णांना बाहेर काढण्यात आलं तसंच अग्निशमन दलाला तातडीनं याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलानं वेळीच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं.

आग लागल्यानं रुग्णालयात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या अनेक रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरसहीत बाहेर आणण्यात आलं आणि जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. जनरेशन रुग्णालयाच्या स्टाफच्या तत्परतेमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले.

यापूर्वी ३० एप्रिल रोजी गुजरातच्या भरूच शहरातील वेल्फेअर रुग्णालयातील कोविड केअर वॉर्डला लागलेल्या आगीत १४ रुग्ण आणि दोन नर्सेसचा होरपळून आणि श्वास कोंडल्यानं मृत्यू झाला होता. तर गोव्यात 2 दिवसांपूर्वी ऑक्सिजन गळती मुळे रुग्णांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

error: Content is protected !!