12 वी चा निकाल उद्या

टीम : ईगल आय मीडिया

 महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. कोरोनामुळे यंदा 12 वीच्या परीक्षा झालेल्या नाहीत. इयत्ता 10 वी च्या पॅटर्न नुसार निकाल जाहीर केला जाणार असल्याने बारावीच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इ.12 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थी खालील वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.

http://mh-hsc.ac.in

http://hscresult.mkcl.org

http://mahresult.nic.in

https://msbshse.co.in

https://hscresult.11thadmission.org.in

www.mahresult.nic.in

अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.12 वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

कोविड 19च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल.

Leave a Reply

error: Content is protected !!