या वेबसाईटवर पहा तुमचा 12 वी’चा निकाल

आज दु.4 वाजता जाहीर होणार इयत्ता 12 वी चा निकाल

टीम : ईगल आय मीडिया

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता 12 वी चा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. इयत्ता 10 वी च्या निकाल दिवशी पोर्टल हँग होऊन विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला होता. ही तांत्रिक बाब लक्षात घेऊन यावेळी बोर्डाने 5 पोर्टलचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व्हर डाऊन, सर्व्हर स्लो होण्याचे प्रसंग टळतील आणि विद्यार्थ्यांना सुलभतेने निकाल पाहता येईल.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर आज मंगळवार, दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

http://hscresult.mkcl.org

http://mahresult.nic.in

https://msbshse.co.in

https://hscresult.11thadmission.org.in

www.mahresult.nic.in

 या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच

www.mahahsscboard.in

या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत घेता येईल.

Leave a Reply

error: Content is protected !!