इयत्ता 12 वी चा निकाल जाहीर

99.63 टक्के निकाल : मुलींची बाजी

टीम : ईगल आय मीडिया

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा न घेता लावलेल्या निकषानुसार इयत्ता 12वी चा निकाल आज दुपारी जाहीर केला आहे. विक्रमी 8 टक्क्यांची वाढ होऊन निकाल 99.63 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे परीक्षा न होता सुद्धा यंदा 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहेत. तर 46 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं.


राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला. यंदा राज्यात 99.63 टक्के निकाल लागला असूूून

नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के तर 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.91, 435 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. 1372 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहेत. 66871 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 66867 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 94.31 टक्के लागला आहे.

https://hscresult.11thadmission.org.in

https://msbshse.co.in

https://msbshse.co.in

या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकाल पाहता येईल.

अधिक माहिती देताना पाटील पुढे म्हणाले की, विभागानुसार कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.81 टक्के तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा निकाल 99.34 टक्के आहे. मुलींचा निकाल 99.81 टक्के तर मुलांचा निकाल 99.54 टक्के लागला आहे.

यावर्षीचा निकाल 8.97 टक्क्यांनी वाढला विज्ञान मागील वर्षी 96.93 टक्के, यावर्षी 99.45 टक्के, 2.52 टक्क्यांनी जास्त कला शाखेचा मागच्या वर्षीचा निकाल 82.63 टक्के होता. यंदा हा निकाल 99.45 टक्के, 17.20 टक्क्यांनी जास्त असून वाणिज्य शाखेचा मागच्या वर्षीचा निकाल 91.27 टक्के होता. यावर्षी 99.91 टक्के निकाल लागला. हा निकाल 8.64 टक्क्यांनी जास्त आहे. एमसीव्हीसीचा मागील वर्षाचा निकाल 86.07 टक्के होता, यावर्षी 98.80 टक्के आहे, हा निकाल 12.73 टक्क्यांनी जास्त आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!