हुलजंती ग्रामपंचायत : सरपंच, उपसरपंचपदी भालके गटाचे वर्चस्व

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

तालुक्याच्या दक्षिण भागातील महत्वाच्या आणि मोठ्या हुलजंती ग्रामपंचायतीवर दिवंगत आम. भारत भालके गटाचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले आहे. सरपंच आणि उपसरपंच पदी भालके गटाचेच सदस्य निवडून आले आहेत.

हुलजंती ( ता. मंगळवेढा ) ग्रामपंचायत सरपंचपदी दिवंगत आम. भालके गटाच्या सौ.मिनाक्षी शिवानंद कुरमुत्ते आणि उपसरपंच पदी भालके गटाचेच बाळासाहेब शिवाप्पा माळी यांची निवड झाली.

याबद्दल स्व. आमदार भारत ( नाना ) भालके यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, माजी जि. प. सदस्य व्यंकट ( आण्णा ) भालके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत बेदरे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पवार, बसवराज पाटील, माजी नगराध्यक्ष भारत नागणे, पंचायत समिती सदस्य ईश्वर गडदे, कमांनंद हेगडे, द्रोणाचार्य हाके, अजित यादव आदि उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!