अकलूजकर धवलसिंह मोहिते – पाटलांनी संपवली बिबट्याची दहशत
टीम : ईगल आय मीडिया
मागील 15 ते 20 दिवसांपासून बीड, अहमदनगर जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील 6 जनांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा वांगी नंबर 4 गावातील राखुंडे वस्ती येथे शुक्रवारी अखेर खात्मा करण्यात आला. शूटर्सनी गोळ्या घालून बिबट्याला ठार मारण्यात यश मिळवले आहे.
मागील आठ दिवसांत या शूटर्स नाही चकवा देणारा बिबट्या शुक्रवारी सव्वा सहा वाजता वांगी नंबर 4 मधील राखुंडे वस्ती येथे मात्र अकलूजचे डॉ. धवलसिंह मोहिते -पाटील आणि चंद्रकांत मंडलिक यांच्या गोळ्यांचा शिकार ठरला. त्यानंतर करमाळावासीयांनी जल्लोष साजरा केला.
करमाळा तालुक्यातील अंजनगाव, लिंबेवाडी, बिटरगाव, वांगी आदी भागात तीन जणांचा बिबट्याने बळी घेतला होता. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते. वन विभागाने बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली होती आणि धवल सिंह मोहिते-पाटील, चंद्रकांत मंडलिक या शार्प शूटरची त्यासाठी नेमणूक केली होती.
या नरभक्षक बिबट्याचा खात्मा केल्यानंतर करमाळा तालुक्यातील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. सोलापुरात बिबट्याचे पोस्टमार्टेम केले जाईल असे सांगितले जात आहे.
तुम मुझे बिटरगावं ढुंड रहे थे और मै यहा वांगी मे आपका इंतजार कर रहा था…🤪🤪