पंढरपूरचे आय. ए. एस. नितीन खाडे आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी

पंढरपूर : ईगल आय मीडिया
मूळचे पंढरपूरचे व सध्या आसाम मध्ये कार्यरत असलेले नितीन शिवदास खाडे ( आयएएस ) यांची आसाम सरकारच्या मुख्य निवडणुक अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. आसाम विधानसभेच्या निवडणुका एप्रिल-मे 2021 मध्ये होणार आहेत. कोरोना च्या पार्श्वभूमीवर निवडणुक यंत्रणा राबवणे आव्हानात्मक असणार आहे.

श्री. खाडे यांनी पुणे येथून लॉ ची पदवी घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. आसाम मध्ये विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम पाहिले आहे. महाराष्ट्रात बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , पुणे परिवहन सेवेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक म्हणून देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सध्या ते आसाम मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या उत्तम कामाची दखल घेऊन भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने त्यांची आसाम सरकार च्या मुख्य निवडणुक अधिकारी पदी नियुक्ती केली आहे.
नितीन खाडे हे श्री विठ्ठल सहकारी आणि चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक कै. एस. डी. खाडे यांचे पुत्र आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!