कोरोनाचे नवे रुग्ण आणि मृत्यू ही वाढले

राज्यातील कोरोनाचे प्रमाण चिंताजनक

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ९ हजार नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले असून कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. आज एकूण १८० रुग्णांनी प्राण गमावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कमी होणारी दैनंदिन करोना रुग्णांची संख्या आज वाढली असून हा बदल चिंतेत भर घालणारा आहे.

राज्यात काल ८ हजार १७२ रुग्णांचे निदान झाले होते. तसेच आज तुलनेने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटली असून आज एकूण ५ हजार ७५६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आजच्या १८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ८० हजार ३५० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०३ हजार ४८६ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १६ हजार ४१४ इतका आहे.

तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १५ हजार ८२४ इतके रुग्ण आहेत. तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या १० हजार ६९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर सांगलीत सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. 

Leave a Reply

error: Content is protected !!