एका दिवसात उच्चांकी कोरोना केसेस

97 हजार 570 नवे रुग्ण

टीम : ईगल आय मीडिया

उच्चांकी ९७ हजार ५७० नव्या रूग्णांची नोंद झाली. तर देशात १ हजा २०१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यविभागाकडून देण्यात आली. यानंतर देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ४६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

गेल्या चोवीस तासांत देशात ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद झाली असून १ हजार २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४६ लाख ५९ हजार ९८५ वर पोहोचली आहे.

देशात सध्या ९ लाख ५८ हजार ३१६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत ३६ लाख २४ हजार १९७ रूग्णांनी उपचारानंतर करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ७७ हजार ४७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Leave a Reply

error: Content is protected !!