महाराष्ट्र ६ लाखांच्या वेशीबाहेर
टीम : ईगल आय मीडिया
देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २५ लाखावर गेली असून येत्या काही दिवसांत भारत कोरोना ग्रस्तांच्या यादीत दुसऱ्या स्थानी जाऊ शकतो. दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे दिसून येते. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या २ दिवसांत ६ लाख होण्याची शक्यता आहे.
राज्यात शनिवारी १२,६१४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, १५ ऑगस्ट च्या दिवसभरात ३२२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ५ लाख ८४ हजार झाली असून, आतापर्यंत १९,७४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत २४ तासांत १२५४ जणांना करोनाचा संसर्ग झाला, तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या एक लाख २७ हजार ७१६ वर पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत ७ हजार ८३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात २५ लाख २६ हजार
गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत ६५ हजारानी वाढ झाली आहे, तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील करोना रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजार १९२ वर पोहोचली आहे. देशात आत्तापर्यंत ४९ हजार ३६ रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. गेल्या चोवीस तासांमध्ये उच्चांकी ५७ हजार ३८१ रुग्ण बरे झाले. करोनामुक्त होण्याचे प्रमाण आता ७१.६० टक्क्यांवर गेले आहे.