पोस्ट विभागाकडून तर्फे ‘ज्वारी’वर विशेष पोस्ट प्रकाशित


संक्रमण काळातही भारतीय डाक विभागाचे कार्य अविरत सुरू


पंंढरपूर : ईगल आय मीडिया


भारतीय डाक विभागाचे कोरोना संक्रमण काळातही कार्य अविरत चालू असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाच्या पोस्टमास्टर मधूमिता दास यांनी केले. त्या भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत येणाऱ्या, पुणे क्षेत्रीय कार्यालय यांचे मार्फत “मंगळवेढा ज्वारी ” वर एक विशेष कव्हर शुक्रवारी मंगळवेढ्यात प्रसिद्ध करण्यात आले या प्रसंगी बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर सहाय्यक आयुक्त अर्जुनसिंह पाटील आत्मा चे प्रकल्प संचालक मदन मुकणे मालदांडी ज्वारी विकास संघाच्या सचिव मंगल काटे आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना त्या म्हणाल्या की कोरोना काळामध्ये डाक विभागातील कर्मचारी वर्गाने कोरोना नियमांचे पालन करून १८ हजार कोटी रुपयांचे विविध योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना घरपोच वितरित केले आहे. याबरोबर डाक विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध बचत योजना, विमा सेवा, आधार सेवा, पासपोर्ट सेवा, आय. पी.पी. बी. सेवा सह इतर सर्व योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.


सहाय्यक आयुक्त अर्जुन सिंह पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातील ज्वारीचे महत्व विषद केले आणि टपाल विभागाचे सदर विशेष अवरणासंदर्भात समाधान व्यक्त केले.


मंगळवेढा तालुक्यातील मोठ्या आकाराच्या, पांढऱ्या मोत्यांचे अर्थात ज्वारीचे उत्पादन करीत आहेत. येथील ज्वारीमध्ये ग्लुकोजची मात्रा अधिक असल्याने ती गोड आहे. इतर धान्याच्या तुलनेत ज्वारी मध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिज पदार्थ, पाचक घटक,ऑंटीअक्सिडेंट अधिक असल्याने ते एक उत्तम खाद्य मानले जाते. डाक विभागा तर्फे ज्वारीवर विशेष आवरण प्रकाशित करण्यात आल्यामुळे मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीची ओळख देशभर होण्यास मदत होणार आहे. मंगळवेढा तालुक्यासाठी ही एक अभिमानास्पद व गौरवास्पद बाब आहे.


आत्मा चे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांनी मंगळवेढा ज्वारीचे वैशिष्ट्ये सांगताना मंगळवेढ्याच्या मृदा वैशिष्ट्यांमुळे ज्वारी मध्ये असलेल्या विशिष्ट गुणधर्माबाबत आणि मालदांडी या ज्वारीच्या नैसर्गिक वाणा बाबत सविस्तर माहिती देऊन आत्मा ( ATMA), सोलापूरकडून राबविण्यात येणाऱ्या शेतकरी हिताच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

मालदांडी ज्वारी विकास संघाच्या सचिव मंगल काटे यांनी मालदांडी ज्वारीस महाराष्ट्र राज्याकडून भौगोलिक मानांकन ( G.I.)मिळवण्यासाठी केलेल्या कार्याबाबत माहिती सांगितली. पी. ई. भोसले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सोमनाथ गायकवाड यांनी केले, तर आभार मंगळवेढा डाक उपविभागाचे निरीक्षक हनुमंत चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमासाठी आर. बी. घायाळ. विजय हिवरे, नागेश डुकरे, सचिन इमडे, प्रशांत काटे यांनी विशेष परिश्रम केले.

Leave a Reply

error: Content is protected !!