परमवीरसिंग देशाबाहेर पळाले ?

तपास यंत्रणांना लागेना पत्ता : युरोपात असल्याचा संशय

टीम : ईगल आय मीडिया

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अटक होण्याच्या भितीनं देश सोडून परदेशात गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी, कोणत्याही अधिराऱ्याला भारत सरकारच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येत नाही. त्यांना गृहमंत्रालय शोधत असून कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार, अशी माहिती दिली आहे.

अँटीलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनआयएनं  परमबीर सिंह यांचा चौकशीसाठी अनेकदा समन्स जारी केलं आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत ते डिलिव्हर झालेलं नाही. एनआयए आणि महाराष्ट्र राज्यातील चौकशी एजन्सींना संशय आहे की, ते अटकेच्या भीतीनं देश सोडून पळाले आहेत. तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह युरोपातील देशात लपले असावेत. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा अद्याप यंत्रणांना मिळालेला नाही.

केंद्रीय गृहमंत्रालयासोबत परमबीर सिंह यांचा शोध घेतला जात आहे. सरकारी अधिकारी असल्याने देशाबाहेर जाण्याआधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ते जर गेले असतील तर ती चांगली गोष्ट नाही. कोणीही मंत्री असो अधिकारी असो वा मुख्यमंत्री असो त्यांना भारत सरकारच्या परवानगीशिवाय देश सोडता येत नाही. याबाबत केंद्र सरकार काय करेल हे पाहावे लागेल. मात्र, सध्या महाराष्ट्र सरकार त्यांना शोधत आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी दिली.

दरम्यान, ते बाहेर गेले असल्याची कुठलीही खात्रीशीर माहिती मिळालेली नाही, आमचे अधिकारी केंद्र सरकारबरोबर समन्वय साधत असल्याचं वळसे पाटील म्हणाले.

परमबीर सिंह यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार : गृहमंत्री
परमबीर सिंह यांच्यावर वेगवेगळ्या कारणास्त कारवाई होतच राहणार आहे. डिसेंबरमध्ये ॲक्शनबाबत कारवाई होणार, उपस्थित न राहिल्यास कारवाई होऊ शकते, त्यांचे उपस्थित राहणं हे महत्त्वाचं आहे. जे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या प्रश्नाचा हिशोब त्यांच्याकडून घ्यायचा आहे. जे नियमाला धरून असेल तेच होईल, असेही गृहमंत्री म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!