जालन्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

पोलीस मुख्यालयात स्वतःवरच गोळ्या झाडून घेतल्या

टीम : ईगल आय मीडिया

जालना पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष गायकवाड यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे. मंगळवार ( दि 8 रोजी ) सकाळी ८.४५ च्या सुमारास पोलिस मुख्यालयात स्वतःवर गोळी झाडून गायकवाड यांनी आत्महत्या केली.

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष गायकवाड हे सकाळी ८.४५ च्या दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले.
शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्येच कारण अद्याप समजले नाही. घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक अभय देशपांडे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!