जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्ताची संख्या 6 हजारच्या टप्प्यात

जळगाव : ईगल आय मीडिया

जिल्ह्यात आज नव्याने 238 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5 हजार 962 झाली आहे. यामुळे जिल्हा आता 6 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांचा टप्पा पार करण्याची औपचारिकता उरली आहे.
रविवारी आलेल्या अहवालात जळगाव शहरात सर्वाधिक 83 रुग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये
जळगाव शहर 83 ,जळगाव ग्रामीण 7, भुसावळ 6, अमळनेर 6, चोपडा 32, भडगाव 8, धरणगाव 15, यावल 10, एरंडोल 4, जामनेर 12, रावेर 13, पारोळा 2 , चाळीसगाव 9, मुक्ताईनगर 31, याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे.


कोरोनामुळे दिवसभरात 8 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात यावल, चोपडा तालुक्यातील प्रत्येकी 2 तर भुसावळ चाळीसगाव रावेर, आणि एरंडोल येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!