टीम : ईगल आय मीडिया
जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून आता 873 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
जालना जिल्ह्यात शुक्रवारी आणखी तेरा संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
जिल्हा रुग्णालयातर्फे प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आलेल्या एकूण 232 नमुन्यांपैकी शुक्रवारी सकाळी 14 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 8 पॉझिटिव्ह तर 6 निगेटिव्ह प्राप्त झाले होते.
218 अहवाल प्रलंबित होते, त्यापैकी 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यात जाफराबाद तालुक्यातील टेम्भुर्णी येथील सुतार गल्लीतील 4,दहीपुरी 3,नूतन कॉलनी भोकरदन 1,घनसावंगी शहर 2,शिवनगाव ता.घनसावंगी 1,कुंभार पिंपळगाव 1 आणि जालना शहरातील आनंदी स्वामी वॉर्ड 1 या प्रमाणे नवीन तेरा रुग्ण आढळून आले आहेत. या संख्या वाढीमुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची एकूण संख्या आता 873 वर पोहचली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.