पाण्यासाठी भारत नानांनी मंत्रिपद नाकारले : ना.पाटील

भाजप सरकारने 35 गावचे पाणी गायब केले होते : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आरोप

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

मंगळवेढ्याला जास्तीतजास्त पाणी मिळावे यासाठी भारत नाना २००९ पासून पाठपुरावा करत होते. भाजप सरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. आपले सरकार आले तेव्हा मंत्री केलं नाही तरी चालेल पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या अशी भूमिका भारत नानांनी घेतली होती असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीनिमित्तानेपक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली होती. वरुणराजासह मंगळवेढ्यातील जनतेचा उत्साह ही शिगेला पोहोचला होता.

यावेळी पुढे बोलताना ना.पाटील म्हणाले, योगायोगाने मी जलसंपदा मंत्री झालो आणि आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. भगीरथ भालके यांच्या नेतृत्वात पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा आमचा मानस आहे.

सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागलं आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भगीरथ भालके यांना विजयी करा. भारत नानांचा हा मुलगा, आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल असे ही ना.पाटील म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!