पंढरपूर तालुक्यातील 5 गट ओबीसी साठी राखीव

5 जिल्हा परिषद गट सर्वसाधारण

टीम : ईगल आय न्यूज


पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहा गटासाठी आज सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी पंढरपूर तालुक्यातील सर्व 10 गटांपैकी 5 गट हे ओबीसी साठी राखीव निघाले आहेत.

तालुक्यातील भोसे जि प सर्वसाधारण, करकंब ओबीसी महिला, रोपळे सर्वसाधारण, गोपाळपूर ओबीसी, गुरसाळे ओबीसी, भाळवणी सर्वसाधारण महिला, वाखरी सर्वसाधारण महिला, टाकळी सर्वसाधारण महिला, पुळूज ओबीसी महिला तर कासेगाव ओबीसीसाठी राखीव झालेला आहे.

यामध्ये कासेगाव, करकंब गुरसाळे, गोपाळपूर आणि पुळुज हे गट ओबीसीसाठी राखीव निघाले आहेत. तर वाखरी, रोपळे, भाळवणी, भोसे, टाकळी हे गट सर्व साधारण झालेले आहेत. त्यामुळे आता इच्छुकांनी जोरदार तयारी सूरु झालेली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!