पंढरपूर : eagle eye news
जेंष्ठ पत्रकार व हॉटेल उद्योजक उत्तम सुभाष अभंगराव (वय 56) यांचे मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास राहत्या घरी ह्दयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर अभंगराव झी वृत्तवाहिनी मध्ये 1997 साली सोलापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून रुजू झाले. 15 वर्षे त्यांनी झी सोबत काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतःचे पोर्टल बातमी पत्र सुरु केले होते. शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक होते सेनेत त्यांनी विविध पदावर काम केले आहे.
निर्भिड व अभ्यासू पत्रकार म्हणून अभंगराव यांचा सोलापूर जिल्ह्याच्या पत्रकारितेत दबदबा होता.
सह्याद्री हॉटेल समूहाच्या माध्यमातून त्यांनी हॉटेल व्यवसायात नावलौकिक केला होता.
गेल्या महिन्यात अभंगराव यांना अर्धांग वायूचा झटका आला होता. त्या आजारातून सावरत असताना आज मंगळवारी सकाळी राहते घरी ह्दय विकाराचा झटका आला.
त्यांना उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंढरपूरच्या वैकुंठ स्मशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.