2 पोलिसांना 4 वर्षांची शिक्षा
टीम : ईगल आय मीडिया
चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोन पोलिसांना तब्बल ११ वर्षांनंतर पाच हजार रुपये दंड आणि चार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वसई सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
माणिकपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक संजय देशमुख आणि बाबासाहेब बोरकर यांनी गाडीच्या अपघाताची नोंद घेऊन गाडीची कागदपत्रे व पंचनाम्याची प्रत देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेतली होती.
सन २००९ रोजी झालेल्या या गुन्ह्यचा निकाल लागला असून सबळ पुराव्यानिशी आरोप सिद्ध झाल्यामुळे आरोपी संजय देशमुख यांना चार वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
तर आरोपी बाबासाहेब बोरकर याला चार वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास एक महिने साध्या कारावासाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विसपुते यांनी या गुन्ह्यचा तपास केला होता तर सरकारी अभियोक्ता म्हणून जयप्रकाश पाटील यांनी काम केले.