शक्ती प्रदर्शन करून कल्याणराव काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणूक : विरोधकांना जागा नाही

फोटो
कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कल्याणराव काळे हे मोटार सायकलवरून गेले. 

पंढरपूर : ईगल आय न्यूज


 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी  विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅलीने  प्रांत कार्यालयात येऊन अर्ज दाखल करते वेळी हजारो सभासद  उपस्थित होते.


सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. सोमवार अखेर ४० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी सुद्धा अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी दिसून आली. चेअरमन कल्याणराव काळे यांनी मंगळवारी आपला अर्ज दाखल केला. ७४ उमेदवारांनी ८० अर्ज दाखल केले आहेत.

यानंतर  पत्रकारांशी बोलताना काळे म्हणाले की,  पूर्ण ताकतीनिशी आम्ही सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन निवडणुकीत उतरलो  आहोत.  बोटावर मोजण्याइतके काही विरोधक बिन बुडाचे आरोप करीत आहेत. या  विरोधकांना आता कायमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही सर्वजण मिळून स्वस्थ  बसणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी स्वतःची व सहकारी संचालकांची मालमत्ता  गहाण  ठेवून ऊस बिल वाटप साठी पैसे उपलब्ध केले आहेत.

यावेळी  विठ्ठल चे माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्यासह काळे, भालके यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!