1 लाख 20 हजारांची लाच : तहसीलदार अटकेत

कल्याण तहसीलदार आणि शिपाई रंगेहाथ सापडले

टीम : ईगल आय मीडिया

जमिनीसंदर्भातील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांची लाच घेताना कल्याणचा तहसीलदार दिपक आकडे व त्याचा सहकारी शिपाई बाबु उर्फ मनोहर हरड या दोघांना लाचालुचत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तसेच अटक केल्याने  महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, कल्याण तालुक्यातील वरप येथील एका बांधकाम कंपनीच्या जमिनीबाबतचे हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी पडताळणी दरम्यान तहसीलदार दीपक आकडे यांनी स्वत: साठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली व ती कार्यालयीन शिपाई बाबू उर्फ मनोहर हरड याचेकडे देण्यास सांगितले. तर शिपाई मनोहर हरड याने स्वत: करिता व स्टाफ करिता वीस हजार रुपये, अशी एकूण एक लाख वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तकार तक्रारदाराने लाचलुचपत विभाग ठाणे यांच्याकडे केली होती.

यानूसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सोमवारी सकाळी कल्याण तहसीलदार कार्यालयात सापळा रचला. तहसीलदार यांच्या शिपाईला तहसीलदार यांच्या करीता एक लाख व स्वत: साठी वीस हजार असे एक लाख वीस हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभाग ठाणे पथकाने रंगेहाथ पकडले.

सदरची कारवाई लाचलुचपत विभाग ठाणे परिक्षेत्राचे अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक निलिमा कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभाग ठाण्याचे पो.नि.संतोष शेवाळे, पो.ना.प्रशांत घोलप, म.पो.ना. जयश्री पवार, पो.शि.विनोद जाधव , पो.शि.पद्माकर पारधी, चा.पो.हवा.महाले आदी पथकाने केली.

Leave a Reply

error: Content is protected !!