भाजपला धक्का : काळे गट करणार राष्ट्रवादी चा प्रचार

जयंत पाटील कल्याणराव काळेंच्या फार्म हाऊसवर स्नेह भोजनास जाणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आज मोठी उलथापालथ होत आहे. भाजपचे नेते, सहकार शिरोमणी वसंतराव काळे याचे अध्यक्ष कल्याणराव काळे गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा प्रचार करणार आहेत. आज काळे गटाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते. त्याचबरोबर राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कल्याणराव काळे यांच्या फार्म हाऊसवर जेवणासाठी जात असल्याचेही समजते. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज कल्याणराव काळे यांनीही प्रमुख पदाधिकारी याची बैठक घेत राष्ट्रवादी चा प्रचार करण्याचे निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने आज दुपारी काळेंच्या आढिव च्या फार्म हाऊसवर जेवणाचा बेत आसून तेथेच प्रचाराचा नवा प्लॅन ‘ शिजणार ‘ आहे असे समजते.

दोन वर्षांपूर्वी भाजपवासी झालेले काळे गेल्या काही दिवसापासुन भाजपा वर नाराज आहेत.त्यामुळे या निवडणुकीत काळे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. आज काळे यानी प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक घेतली व राष्ट्रवादी चा प्रचार करण्याची भूमिका जाहीर केली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी
काळेंचा राष्ट्रवादी सोबत जाण्याचा काळे यांचा निर्णय भाजप साठी धक्कादायक मानले जाते.

Leave a Reply

error: Content is protected !!