कोरोना काळातही जि प सदस्या रजनीताई देशमुख यांचे प्रयत्न
पंढरपूर : ईगल आय मीडिया
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातून करकंब गटातील 300 लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून वस्तू मिळवून दिल्या असल्याची माहिती महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती रजनीताई देशमुख यांनी दिली. करकंब ( ता. पंढरपूर ) येथील नाभिक समाजाला व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या बिग बॉस खुर्च्यांचे वाटप मा जि प सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रजनीताई देशमुख, पं स सदस्य राहुल पुरवत, पांडुरंग नगरकर, दिलीप व्यवहारे, संतोष टकले, दीपक जाधव, आदी उपस्थित होते.
करकंब गावातील १५० व्यक्तीला लाभ करकंब जि प गटातील गावांमध्ये करकंब सर्वात मोठे गाव असल्याने १५० व्यक्तींना वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. गटातील गरजू व्यक्तींना यापूर्वी वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळाला नसेल त्यांनी संपर्क साधून अर्ज करावेत, त्यांना यावर्षी लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असे आवाहन मा सभापती रजनी ताई देशमुख यांनी केले.
कोरोना सारख्या महामारीच्या काळात ही सातत्याने पाठपुरावा करून आमदार प्रशांत परिचारक, माजी जि प सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जि प सदस्या रजनीताई देशमुख यांनी महिला व बाल कल्याण समिती, समाज कल्याण समिती व कृषी समितीमधून करकंब जि प गटात २० लाख रुपयांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना खेचून आणल्या आहेत. जि प मधून शालेय मुलींसाठी सायकली, महिलांसाठी शिलाई मिशन, पिठाची गिरणी, अपंगांसाठी स्टॉल, घरकुल, नाभिक समाजासाठी बिग बॉस खुर्च्या, शेतकऱ्यांसाठी रोटावीटर, कडबाकुट्टी, विद्युतपंप देण्यात आले आहेत.
Super