आ.संजय शिंदे कोरोना पॉझिटिव्ह

उपचारासाठी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महत्वाची जबाबदारी पार पाडलेल्या करमाळा चे आमदार संजय शिंदे यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खुद्द संजय शिंदे यांनीच ही माहिती दिली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान मोठ्या प्रमानात गर्दीच्या सभा झाल्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून आ. शिंदे यांनी खिंड लढवताना मोठ्या प्रमाणात निवडणूक सहभाग दर्शवला आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे मी पुणे इथे उपचार घेत आहे. माझे PA प्रवीण शिंदे यांची ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तरी दोघांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, नागरिकांनी मास्क वापरा,गरज असेल तरच घराबाहेर पडा,सर्व नियम पाळून शासनास सहकार्य करा. असे आवाहन आ.संजयमामा शिंदे यानी केले आहे.

निवडणूक झाल्यानंतर दोन्ही तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. आता आ. शिंदे यांनाही कोरोना झाला आहे. आ.रणजितसिंह मोहिते – पाटील यांनाही 9 एप्रिल रोजी कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. आता आ.शिंदे यांनाही लागण झाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!